स्वातंत्र्य दिनादिवशी कॅप्टन कुल धोनीचा क्रिकेट संन्यास

MSD does a Kohli, fumes over Manish Pandey in the last over (Video ...

माहीसोबत सुरेश रैनानेदेखील केली निवृत्तीची घोषणा

Suresh Raina_1  

मुंबई : भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सगळ्यांचे धन्यवाद देतो, असं धोनी म्हणाला आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने ‘मे पल दो पल का शायर हूं’ हे गाणं ठेवलं आहे. 

भारताचा माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त होत असला तरीही तो आयपीएलमधून खेळणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्याच्या या निर्णयाने जगभरातील क्रिकेट प्रेमींना खूप मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी धोनीने भारतीय कसोटी संघातूनही असाच धक्का देत निवृत्ती जाहीर केली होती. भारताला विजयाची सवय लावणारा हा माही सामना न खेळता निवृत्त होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ‘तुला याहून चांगला निरोप समारंभ मिळणे अपेक्षित होते’ अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

२००४ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ साली टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीने पहिल्यांदाच भारताचं कर्णधारपद भूषवलं. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये धोनीने भारताला २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर २००८ साली ऑस्ट्रेलियातही भारताने वनडे सीरिज धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. 

२०११ सालीही धोनी कर्णधार असताना भारताने ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये धोनीने मॅच विनिंग खेळी करत भारताला २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकवून दिला. यानंतर २०१२ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा विजय झाला तेव्हा धोनी कर्णधार होता. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. 

धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती. 

९ जूलै २०१९ ला एमएस धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल मॅचनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. 

Dhoni finishes off in style!He has retired from international cricket 16 years after making his debut

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्त झाल्याचे इंस्टाग्रामवर एक व्हिडियो पोस्ट टाकून बातमी दिली. या व्हिडीओमध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणे शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. संध्याकाळी ७.३० पासून मला निवृत्त समजावे,” असा मथळा त्याने या पोस्टसोबत लिहला आहे.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनादिवशी संध्याकाळी माहीने स्वतःची निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच सुरेश रैनानेदेखील निवृत्त होत असल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेटमध्ये सुरेश रैनाचे अमूल्य योगदान आहे. भारताकडून खेळताना त्याने अनेक सामने एकहाती जिंकले असून टी-२०मध्ये बराच काल सुरेश रैनाचा दबदबा होता. रैनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये धोनी सोबतचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे एका पाठोपाठ एक असा दुसरा धक्का क्रिकेट रसिकांना बसला आहे.

सुरेश रैनाने फोटो शेअर करत लिहिले की, “ माही, तुझ्यासोबत खेळणे हा एक प्रेमळ आणि अप्रतिम अनुभव होता. मी पूर्ण अभिमानाने तुझ्यासोबत या प्रवासात तुझ्यासोबत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद!” अशा आशयाची भावनिक पोस्ट त्याने केली आहे. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *