‘फिलिप्स’मधील चार हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

लंडन : तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा फिलिप्सने केली आहे. कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मागील काही महिन्यांपासून कंपनीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने उत्पादन घटले आहे. तसेच कंपनीच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हा कठीण निर्णय घेत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. इच्छा नसतानाही आम्ही जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी कठीण आहे. मात्र, काही कारणास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला महागाई, कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर पडला आहे. त्यामुळे नफा वाढवण्यासाठी आता आम्हाला आमच्या खर्चात कपात करावी लागणार असल्याचे जेकब्स यांनी सांगितले.

त्यानुसार कंपनी लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार आहे. जगभरातील विविध देशांमधील हे कर्मचारी आहेत. फिलिप्स या कंपनीचे उत्पन्न अलिकडच्या काळात घटले आहे. त्यामुळे कंपनीला हा कठीण निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा फिलिप्सने केली आहे.