शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चंद्रकांत खैरे यांनी घेतली भेट

मुंबई ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी  दिपावलीनिमित भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.


यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.याप्रसंगी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. मनीषा कायंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.