औरंगाबाद जिल्ह्यात 306 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,पाच मृत्यू
जिल्ह्यात 13642 कोरोनामुक्त, 4342 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 35, ग्रामीण 133) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13642 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 306 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18565 झाली आहे. आजपर्यंत एकूण 581 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4342 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 155 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 35, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 21आणि ग्रामीण भागात 74 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (90) औरंगाबाद (13), फुलंब्री (1), गंगापूर (7), कन्नड (2), सिल्लोड (12), वैजापूर (1) पैठण (36), सोयगाव (4), गंगापूर उपजिल्हा रुग्णालय (2), भेंडाळा, गंगापूर (1), एसबी शाळा परिसर, गंगापूर (1), सलामपूर, वडगाव (1), फुले नगर, पंढरपूर (1), लाडसावंगी (1), नांदराबाद, गंगापूर (1), आंबेगाव, गंगापूर (1), लाडगाव (5)
सिटी एंट्री पॉइंट (35)जळगाव (1), एन नऊ (1), फुलंब्री (4), बीड बायपास (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हर्सुल (1), राम नगर (1), एन दोन (4), सातारा परिसर (2), सोयगाव (1), गणोरी (1), एन बारा (1), गंगापूर (2), पडेगाव (2), शिवाजी नगर (5), सिल्लोड (1), नंदनवन कॉलनी (2), रांजणगाव (3), अन्य (1)
मनपा (09) एनआरएच हॉस्टेल (1), एन पाच सिडको (1), एन दोन सिडको, म्हाडा कॉलनी (1), घाटी परिसर (1), गारखेडा (1), युनायटेड सिग्मा हॉस्पीटल परिसर (1), अन्य (3)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन चार सिडकोतील 28, हर्सुल येथील 14, छावणीतील 79 वर्षीय स्त्री, संभाजी कॉलनी, सिडकोतील 65 आणि खासगी रुग्णालयात 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.