बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड दि. 15 :–स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे झाला.

Image
Image

याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.यावेळी आणि उपस्थित मान्यवर शहीद कुटुंबीय यांची भेट घेऊन पालकमंत्री श्री मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत नाळवंडी आणि आणि ग्रामपंचायत सांडरवनचे सरपंच व ग्रामसेवक यांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Image

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र कोविड विलनीकरण कक्षाचे आज उदघाटन केले, या कक्षामुळे करोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना चांगले उपचार मिळणार आहेत.

Image

बीड येथील वीरपत्नी भाग्यश्रीताई राख यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे जमीन देण्याविषयी चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार गावात शक्य नसल्याने जिल्ह्यात इतरत्र जमीन उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *