लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्र्यांच्या हस्ते रान-भाज्या स्टॉलचे उद्घाटन

लातूर,दि.15(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिना निमित्त वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वातंत्र्य दिन समारंभाला उपस्थित निमंत्रीत लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी ,अधिकारी , कर्मचारी व अन्य मान्यवरांची भेट घेऊन त्यांना व सर्व जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

रान-भाजी स्टॉलचे उद्घाटन :-कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रान-भाजी महोत्सव दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी औसा रोडवरील दत्त मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात थाटण्यात आलेल्या रान- भाजी स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी स्टॉल मध्ये ठेवण्यात आलेल्या रान-भाज्यांची माहिती देऊन त्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्व विशद केले.

स्वातंत्र्य दिन समारंभाचे ड्रोनव्दारे फेसबुक लाईव्ह :-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या https://www.facebook.com/G.SreekanthIAS/ यांच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रथमच थेट ऑनलाईन प्रक्षेपण ड्रोनव्दारे करण्यात आले. त्यामुळे हजारो लातूरकर नागरिकांना हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसून पाहता आला.या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेले स्वातंत्र्य सैनिक ,वीर-माता, वीर पत्नी, वीर पिता या सर्वांचा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री महोदयांचा स्वातंत्र्य दिनाचा सैनिकांसाठीचा शुभेच्छा संदेश ही देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *