बगडी येथे 25 लक्ष रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना कामाचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर विधानसभा मतदारसंघात असलेल्या गंगापुर तालुक्यातील बगड़ी येथे पाणीपुरवठा विभागाच्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा  योजनेसाठी 25 लाख 89 हज़ार रूपयांचा निधी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आला असून या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमीपूजन महंत भास्करगिरी महाराज यांच्याहस्ते बुधवारी (ता.19) झाले. आ. बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 मौजे बगडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सद्गुगुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा समाप्ती निमीत्त श्री क्षेत्र देवगड मठाधिपती ह. भ. प. महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनासही आ.बोरणारे यांनी भेट देऊन महाराजांचे आशिर्वाद घेतले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, शिवाजी पाटील बोडखे, राहुल काळवणे, अशोक पाटेकर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.