महारोजगार मेळाव्याचे आयोजन विविध उद्योग समूहात तरूणांना रोजगाराची संधी

औरंगाबाद,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जिल्हा कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद,  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व राष्ट्रीय इलेक्ट्रानिकी एवं सुचना प्रौद्योगिकी संस्थान (N.I.E.L.I.T.) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इलेक्ट्रानिकी एवं सुचना प्रौद्योगिकी संस्थान (N.I.E.L.I.T.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद येथे बुधवार  19 ऑक्टोंबर  रोजी सकाळी 9:30 वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.

               या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे, कोळसा व खाणी रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच रोजगार हमी योजना व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे.

            या महारोजगार मेळाव्यामध्ये रूचा इंजिनियरींग प्रा.लि., बीडवे इंजिनीयरींग ली. औरंगाबाद, परम स्किल ट्रेनिंग इंडिया औरंगाबाद, लिभेर अप्लायन्स इंडिया प्रा.लि. औरंगाबाद., जैन स्पेसेस ॲड अॅग्रो प्रोडक्ट प्रा.लि.औरंगाबाद, हारमन फिनोकेम ली. औरंगाबाद, धुत ट्रान्समिशन प्रा.लि. शेंद्रा, औरंगाबाद, नवभारत फर्टीलायझर्स, औरंगाबाद, एन एच के ऑटोमोटीव कॉम्पोनन्ट्स इंडीया प्रा. लि. औरंगाबाद, रेडीको एन व्ही डिस्लरीज महाराष्ट्र लि.औरंगाबाद, टॉवर मेकॅनिक प्रा.लि. औरंगाबाद, संजिव ऑटो पार्ट्स मॅनीफॅक्चरर प्रा.लि. औरंगाबाद, मेटलमन ऑटो लि.औरंगाबाद., ईएसएस डीईर्इ इंडस्ट्रिज औरंगाबाद, स्टरलाईट टेक्नॉलॉजी ली.औरंगाबाद, ईप्का (IPCA) लॅबोरेटरीज ली. औरंगाबाद, एक्सलंट टिचर, औरंगाबाद, मॅक्स लाईफ इंन्शूरन्स, औरंगाबाद, रत्नप्रभा कार्स प्रा.लि., औरंगाबाद, इंन्स्टा ह्युमन मॅनेजमेंट प्रा.लि. औरंगाबाद इ.जिल्हयातील नामांकित नियोक्त्यांनी इंजिनीअरींग पदवी, पॉलिटेक्नीक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर,  दहावी ,बारावी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक  उमेदवारांसाठी  रोजगाराची साधारणपणे 1 हजार 162 पदे उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

                 या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन नोंदणी करावी आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

               संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी नोंदणी करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  जिल्ह्यातील जास्तीत जास्तीत रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी केले आहे.