वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक शिवसिंग राजपूत यांचे निधन

वैजापूर,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील राजपूत समाजातील जेष्ठ नागरिक तथा वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक शिवसिंग राजपूत (कहाटे ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (ता.16) निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते.मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , मुली, सुना -नातवंडे असा परिवार आहे.स्व. राजपूत यांच्या पार्थिवावर शहरातील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्व.शिवसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती, डॉ. व्ही जी .शिंदे, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, व्यापारी संघटनेचे काशीनाथ गायकवाड आदींनी शोक व्यक्त केला.