वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत समस्या सोडण्यासाठी 40 कोटी मंजूर ; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या विद्युत समस्यांविषयी आ. बोरणारे यांनी मांडल्या होत्या समस्या

वैजापूर,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या बैठकीत आ.रमेश पाटील बोरणारे यांनी वैजापूर मतदार संघातील शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या  विद्युत प्रश्नासंदर्भात व इतर समस्यांविषयी प्रश्न मांडले असता पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तात्काळ 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे घोषित केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या या आढावा बैठकीत आ.रमेश बोरणारे यांनी वैजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महत्वकांक्षी असलेल्या विद्युत समस्यांविषयी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा व्हावा यासाठी जास्तीत जास्त विद्युत रोहित्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली यावर पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी विद्युत सक्षमीकरणासाठी 40 कोटींचा निधी मंजूर केल्याचे  घोषित केले. निधी मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.