जन्म-मृत्यू चक्राच्या दु:खास प्राप्त होणारा जीव-स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ​ ​अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मद्य न विषय समान है, मुनि मन​ छोभत ज्ञान । 

गति पामर जिव कौन है, मायावश​ ​अज्ञान ।।२१।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ​ ​अध्याय) ०४/०६/२१

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

इंद्रियांचे विषय नशेसमान आहेत, ज्यामुळे जीवाला आत्मज्ञानाची विस्मृती होते. यामुळेच स्थिर बुद्धी असणाऱ्या मुनी जनांचे ज्ञानही चंचल होऊन जाते आणि ते विषयांच्या आवेगाने दु:खी होतात. अज्ञानामुळे माया विषय-मायेच्या वशीभूत होऊन हा जीव अधोगतीला प्राप्त होतो. म्हणून जन्म-मृत्यू चक्राच्या  दु:खास  प्राप्त होणारा जीव आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org