वैजापूर तालुक्यात संजय निराधार योजना व श्रवणबाळ योजनेची 5 हजार 484 प्रकरणे मंजूर ; लाभार्थ्यांना शनिवारी मंजुरीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम

वैजापूर,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात  संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजनेची एकूण 5 हजार 484 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लाभार्थ्यांना शनिवारी (ता.15) मंजुरीचे पत्र वाटप करण्यात येणार आहे. 

महसूल विभागातर्फे महा राजस्व अभियानांतर्गत संजय गांधी निराधार व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वैजापूर-गंगापूर हायवे चौफुलीवरील साई लॉन्स येथे शनिवारी (ता.15) सकाळी 11 वाजता आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मा. नगराध्यक्ष साबेरखान अमजद खान, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांची एकूण 5 हजार 484 प्रकरणे मंजूर झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 4 हजार 754 तर वैजापूर शहरातील 730 प्रकरणाचा समावेश आहे.