उच्च ध्येय गाठण्यासाठी स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायला शिका – मकरंद अनासपुरे 

राष्ट्रचेतना- २०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचा समारोप 
नांदेड ,१२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला गुण आहेत, मराठवाडा हे कलेचे माहेर घर असून या मातीतून अनेक कलावंत घडले आहेत. कुठलीही कला सादर करताना स्पर्धकांनी न्यूनगंड न बाळगता आपली कला सादर करावी. मी ही मराठवाड्यातल्या मातीतून घडलेला आहे. कुठल्या भाषेची किंवा त्या भागाची तमा न बाळगता माझा आजवरचा प्रवास आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायला शिका. यश आपोआप मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठाच्या ‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभ प्रसंगी आज बुधवार, दि.१२ ऑक्टोबर, रोजी लोकशाहीर वामनदादा कर्डक कलामंचावर मार्गदर्शक करताना केले.

 
अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, हॅप्पी इंडिया व्हिलेजचे संस्थापक रवी बापटले, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ. एल. एम. वाघमारे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मालिकार्जून करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. विजय पवार, नांदेड गुरुद्वाराचे बाबा कुलदीपसिंघ, स्वागताध्यक्ष संजय पवार, विद्यार्थी विकास समिती सदस्य, विद्यार्थी विकास सल्लागार समितीचे सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, कला ही कुठल्याही वर्ग आणि वर्णाची नसून ती कुणालाही कष्टाने मिळवता येते. प्रत्येक विद्यार्थीला प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. त्यामुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढत आपले ध्येय गाठावे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते पालकापेक्षा महत्वाचे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचण्या साठी वेळ द्यावा. स्वतःशी स्पर्धा स्वतःशी करा म्हणजेच यश मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, असे ते बोलताना म्हणाले. माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कला सादर करणे म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त कला समजली जात होती. परंतु आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला वेगळास्तर मिळालेला आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, असे ते म्हणाले.

विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विश्वधार देशमुख आणि डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. ओमप्रकाश दरक यांनी मानले.

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कला महाविद्यालय लातूर

राष्ट्रचेतना२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या ललित कला विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेते महाविद्यालय खालीलप्रमाणे आहेत. 

चित्रकला (वैयक्तिक) : प्रथम :- शारदा महाविद्यालय, परभणी द्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तृतीय :- पीपल्स कॉलेज, नांदेडकोलाज (वैयक्तिक): प्रथम :- श्री शिवाजी कॉलेज, परभणी द्वितीय :- एम. जी. एम. ऑफ फाईन आर्ट नांदेड तृतीय :- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर.   
पोस्टर मेकिंग (वैयक्तिक) : प्रथम :- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड द्वितीय :- हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर मृद मुर्तीकला (वैयक्तिक) : प्रथम :- बहीर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत द्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ फाईन आर्ट नांदेड तृतीय :-श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार
व्यंगचित्रकला (वैयक्तिक) : प्रथम :- आदर्श महाविद्यालय, हिंगोली द्वितीय :-दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर  तृतीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूररांगोळी (वैयक्तिक) : प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरद्वितीय :- रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालय, परभणी तृतीय :- यशवंत महाविद्यालय, नांदेड 
स्थळ छायाचित्रण (वैयक्तिक) : प्रथम :-एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड द्वितीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूरतृतीय :- तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगावकलात्मक जुळवणी (इंस्टॉलेशन) : प्रथम :- श्री. योगानंदस्वामी कला महाविद्यालय, वसमतनगर, जि. हिंगोली. द्वितीय:- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी   तृतीय :- श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
वादविवाद (सांघिक) : प्रथम :- इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, नांदेड द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीतृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरवत्कृत्व (वैयक्तिक) : प्रथम :- श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- यशवंत महाविद्यालय, नांदेडतृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूर याना विभागून देण्यात आले आहे. 

राष्ट्रचेतना२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या संगीत विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेते महाविद्यालय खालील प्रमाणे आहेत. 

शास्त्रीय गायन (वैयक्तिक) : प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी तृतीय :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूरशास्त्रीय तालवाद्य (वैयक्तिक) : प्रथम :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूरद्वितीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड तृतीय :- प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड 
शास्त्रीय सुरवाद्य (वैयक्तिक) :  प्रथम :- वै. धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूरद्वितीय :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूरतृतीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड सुगम गायन(भारतीय) (वैयक्तिक) :  प्रथम :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरतृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. 
सुगम गायन (पाश्‍चात्य) (वैयक्तिक) : प्रथम :- जय क्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूरद्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरतृतीय :-  दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि श्री चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. समुह गायन (भारतीय) (सांघिक) : प्रथम :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरद्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरतृतीय :- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर 
समुह गायन (पाश्चात्य) (सांघिक) : प्रथम :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरद्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरतृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांना विभागून देण्यात आले आहे. कव्वाली (सांघिक) : प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरद्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरतृतीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर

राष्ट्रचेतना२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या महाराष्ट्राच्या लोककला विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेते महाविद्यालय खालील प्रमाणे आहेत.

पोवाडा (सांघिक)प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीद्वितीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले आहे.   तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर लावणी (सांघिक)प्रथम :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड द्वितीय :- जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले.  तृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांना विभागून देण्यात आले आहे. 
फोक ऑर्केस्ट्रा (लोकसंगीत) (सांघिक)प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरद्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरतृतीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड जलसा (सांघिक)प्रथम :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर द्वितीय :- बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत आणि श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांना विभागून देण्यात आले. तृतीय :- महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर 

राष्ट्रचेतना२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या महाराष्ट्राच्या नाट्य विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेते महाविद्यालय खालील प्रमाणे आहेत.

नक्कल(वैयक्तिक):  प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरद्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरतृतीय :- जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर विडंबन/उपरोधक अभिनय(सांघिक) : प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीद्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूरतृतीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड
मुकाभिनय (सांघिक) :प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरद्वितीय :- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर   तृतीय :- कॉक्सिट कॉलेज, लातूर एकांकिका(सांघिक):- प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरद्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेडतृतीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर
उत्क्रष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक)प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर  द्वितीय :- पीपल्स कॉलेज, नांदेड  तृतीय:- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेडउत्कृष्ट अभिनय पुरुष(वैयक्तिक)प्रथम :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड   द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर   तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर     
उत्कृष्ट अभिनय स्त्री(वैयक्तिक)प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर  द्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेडतृतीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी   शास्त्रीय नृत्य(वैयक्तिक)प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूरतृतीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड
आदिवासी नृत्य (सांघिक) : प्रथम :-  प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड द्वितीय :

 शोभायात्रा (सांघिक):  

प्रथम :- ग्रामीण टेक्निकल अँण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड 

द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार, जी. नांदेड 

तृतीय :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, बिलोली आणि संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोट, जि. लातूर यांना विभागून देण्यात आले. 

दिवंगत नृत्य रत्न ऋषिकेश देशमुख फिरते चषक : दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर

सर्वसाधारण उपविजेतेपद (जनरल रनर-अप चॅम्पियनशिप) : दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर 

सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) : दयानंद कला महाविद्यालय, लातूर