स्मार्ट इंडिया हॅकेथॉन – २०२२ स्पर्धेत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय देशात प्रथम 

औरंगाबाद,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचालित छत्रपती शाहूअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन – २०२२ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवुन देशात प्रथम 

क्रमांक पटकावला. 

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील कॉम्पुटर 

सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “जिनिअस नूबस” या टीम अंतर्गतओडिशा येथील 

जी. आय. ई. टी. युनिव्हर्सिटी गुणुपुर येथे सहभाग नोंदविला.  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही भारत सरकार, मंत्रालये, विविध 

विभाग, उद्योग आणि इतर संस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून

 देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेलचा देशव्यापी उपक्रम आहे.
या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध महाविद्यालयातील २०३३ संघानी सहभाग नोंदविला होता.”जिनिअस नूबस” या टीमने “सायबर सेक्युरिटी” या विषया अंतर्गत 

“नेटवर्क ट्रॅफिक अँनलायझर” हेसॉफ्टवेअर बनविले. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेत सलग ३६ तास कोडींग करत तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी टीममध्ये – शिवराज पाटील (टीम लीडर), 

आशिष सोळंके, सुमेध पवार, समृद्धी कुलकर्णी, विशाल मुऱ्हाडे, विजय कागदे हे ०६ विद्यार्थी आणि प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. मीनाक्षी पाचपाटील हे दोन 

फॅकल्टी मेंटॉर यांनी परिश्रम घेतले.  
“जिनिअस नूबस” या टीमच्या यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे, अध्यक्ष  रणजित मुळे, 

प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, छत्रपती शाहु 

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. संदीप अभंग यांनी अभिनंदन व कौतुक केले.