हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 61 रुग्ण; तर एकाचा मृत्यु

12 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, 340 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली,दि.13: जिल्ह्यात आज 61 नवीन कोविड-19 चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर 05 व्यक्ती, कळमनुरी परिसर 17 व्यक्ती, वसमत परिसर 05 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, सेनगांव परिसर 06 असे एकुण 36 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर हिंगोली 14 व्यक्ती, गुगुळ पिंप्री ता. वसमत 01 व्यक्ती, कुरुंदा ता. वसमत 01 व्यक्ती, औंढा शहर 04 व्यक्ती, आसोंडा ता. औंढा 01 व्यक्ती , शिरड शहापूर ता. औंढा 01 व्यक्ती, कळमनूरी 02 व्यक्ती आणि साखरा ता. सेनगांव 01 व्यक्ती असे एकूण 25 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तसेच आज कोविड-19 मुळे एका जणाचा मृत्यु झाला असून 12 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 03 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1037 रुग्ण झाले असून, त्यापैकी 686 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 340 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 11 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *