मन हाच या सृष्टीचा रचनाकार-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

निज स्वरुप से भिन्न जो, दौड़ जहाँ लगि जाय ।
सो सब धोखा मनहिं का, मनहिं जगत उपजाय ।।१३८।।

 (स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१३८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
आत्म्याची स्वतःच्या चेतन रूपास सोडून इतरत्र जिथपर्यंत जाण्याची प्रवृत्ती होते ती मनाची फसवणूक अर्थात बहकाव आहे. मन हाच या सृष्टीचा रचनाकार आहे अर्थात आत्म्यास सृष्टी कडे आकृष्ट करणारे किंवा तिच्याशी संपर्क घडवणारे मनच आहे. आत्मा जेव्हा योग-युक्ती द्वारे आपल्या चेतन शक्तीला मनापासून वेगळे करतो, तेव्हा सृष्टी पासून त्याचे पार्थक्य होते. म्हणून मनाला समजणे आणि त्याच्या पासून स्वतःला वेगळे करण्याची युक्ती जाणणे हे साधकांसाठी आवश्यक आहे.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६५.
www.vihangamyoga.org