वैजापुरात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा

वैजापूर,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसरात  सकाळी वाजता नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  सामुदायिक बुद्ध वंदना व तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला. नगरसेवक दशरथ बनकर, नगरसेविका संगीता गायकवाड, राजेश गायकवाड, पत्रकार सुनील त्रिभुवन, जीवन पठारे, अशोक पगारे, डॉ.आबासाहेब कसबे, सिद्धार्थ भुईंगळ, साहेबराव पडवळ, अशोक बागुल, सुमीत कांबळे, सागर सोनवणे, प्रमोद पठारे, विलास त्रिभुवन, ज्ञानेश्वर शेजवळ, भीमराव  भिवसने, प्रमोद वैद्य, विजय दिवेकर,राजविर त्रिभुवन,श्रीकांत जाधव, कविता कसबे, छाया जाधव, मेघराज त्रिभुवन , प्रमोद निकाळजे, ताराचंद त्रिभुवन, सकाहारी थोरात ,  सुभाष आल्हाट, रमेश जाधव, मनिष गणवीर, ईरबा शिंदे, पंडित मोरे यांच्यासह आंबेडकरी अनुयायांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.