वैजापुरात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

वैजापूर,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.2) शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम झाला.

येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात निवृत्त शिक्षणाधिकारी व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.विठ्ठलसिंह ढाकरे, जेष्ठ नागरीक राजाभाऊ संचेती यांच्याहस्ते या महान नेत्यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी  शाळेचे मुख्याध्यापक जी.जी.राजपूत, शिक्षक बी.बी.जाधव, सत्यजित राजपूत, अविनाश यांची उपस्थिती होती. वैजीनाथ वाचनालयात ही ग्रंथपाल संजय राजपूत यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. श्री. स्वामी समर्थ विद्यालयात ही राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.