अगरसायगाव सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश चरवंडे तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकला जाधव यांची बिनविरोध निवड

वैजापूर,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत अगरसायगांवच्या चेअरमनपदी सुरेश चरवंडे ( राजपुत ) तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकला किसन जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . वैजापूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात अध्यासी अधिकारी एस.टी. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली . चेअरमनपदी सुरेश चरखंड ( राजपुत ) व व्हाईस चेअरमनपदी चंद्रकला किसन जाधव यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली अगरसायगांव सोसायटी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी सदस्य कांतीलाल शिहरे, दत्तु जाधव, रमेश जाधव , गोटीराम जाधव, किसन मुराडे, सुदाम बेडवाल , प्रदीप वगदे , रामभाउ वगदे , रामनाथ साळवे , संगीता सिताराम जाधव , दिपक ढोरे या सदस्यासह वाल्मीक जाधव , मोहन मरमट, शंकर साळवे, नारायण पुतळे , सिताराम जाधव , विलास रामैय्या, बापु रोठे, नंदु सोनवणे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे स्वागत व सत्कार केला .