वैजापूर तालुक्यातील हाजीपूरवाडी व तरठयाचीवाडी येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,१ ऑक्टोबर​   /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील मौजे हाजीपुरवाडी व तरट्याचीवाडी येथे शासनाच्या विविध योजनेतून मंजुर झालेल्या एकुण 35 लक्ष रुपये निधीतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम, शाळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, वाडी-वस्ती वरील रस्ते, क्रिडा साहित्य वाटप अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार रमर्ष पाटील बोरणारे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  रामहरी बापू जाधव, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, विभागप्रमुख प्रभाकर पाटील जाधव, बाळासाहेब  जाधव, उपकार्यकरी अभियंता कीर्तने , किरण आवारे  सरपंच काकासाहेब गायकवाड, प्रभाकर सोनवणे, राजेश मुंगी, पांडूरंग बोरकर, नरेंद्र सरोवर, पुरुषोत्तम पिंगाट, किरण तुपे, दिपक घुनावत, चैनसिंग काकरवाल, लखन काकरवाल, अंबरसिंग गुसिंगे, उदलभाऊ गोमलाडू, गोरखसिंग जारवाल, फुलसिंग गुसिंगे, कांतीलाल चुडीवाल, ग्रामसेवक काळे, रामेश्वर मेवाळ, रमेशभाऊ घुनावत, करण काकरवाल, केसरसिंग कवाळे, गांधीसिंग गुसिंगे, मोहन जाधव, विजय पवार, ईश्वर गुसिंगे, शिंगारे सर, ईश्वरभाऊ काकरवाल, राजू ताजी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.