महिलांनी अन्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजे-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लासूरगाव महिला आघाडीची बैठक

वैजापूर,१ ऑक्टोबर​ /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लासूरगांव येथील विठ्ठल रखमाई मंदीरात शिवसेना महिला आघाडीची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.1) झाली.

या बैठकीत दसरा मेळावा निमित्त संवाद साधताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की,  महिलांवर दिवसेंदिवस अन्याय वाढत असून महिलांनी अन्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजेत. एकञित येवून संघटन करा, आत्मविश्वास बाळगा. 40 गेले तर 140 करण्याची तयारी ठेवा असे मार्गदर्शन करुन शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या बैठकीत काही पदाधिका-यांच्या निवडीही करण्यात आल्या.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी,शहरप्रमुख आ प्रकाश शेट चव्हाण,उपतालुकाप्रमुख डॉ प्रकाश पाटील शेळके, सिताराम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, भाऊसाहेब गलांडे,  विभागप्रमुख नंदू जाधव, गोरखनाथ शिंदे, मोहन पाटीलसाळुंके ,भिमाशंकर तांबे, सुरेश आल्हाट, विठ्ठल डमाळे, रविंद्र पाटील, महिला आघाडीच्या वर्षाताई जाधव,लतातई पगारे,जयश्री बोरनारे,रमेशकाका सावंत, विष्णू शेजूळ, वाल्मिक हरिश्चंद्रे, नामदेव वाकडे, बाळासाहेब बडक, चंदर मूकीन, अक्षय साठे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.