कोरोना ‘लस’ची केली नोंदणी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीला दिली पहिली लस

मॉस्को,
रशियाच्या कोरोना लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लसीची मात्रा दिली असल्याचे सांगितले. रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या ‘लस’ला मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा ही लस देण्यात आली आहे, असे पुतिन यांनी सांगितले.

कोरोनावर औषध तयार करण्यासाठी जगात स्पर्धा लागली. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, भारत आदी देशांत यावर संशोधन करण्यात येत आहे. मात्र, अमेरिका ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाने कोरोना व्हायरसवरील लसची निर्मिती केली. त्याची अधिकृत नोंदणीही केली आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस  होता. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते की, कोरोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला कोरोनावर लसीची निर्मिती करायची आहे. रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसची मानवी चाचण्या झाली आहे. लस सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लस देण्याचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

संशोधकांनी स्वत:वर केली होती लशीची चाचणी
मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्युटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *