गोमाता जगविण्याचा संकल्प करा – क्रांती नवरात्र उत्सवात साध्वी वैभवी श्रीजी यांचे प्रतिपादन

वैजापूर,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-आज गोमातांवर मोठे संकट आहे या संकटातून गोमातांना मुक्त करण्याचा संकल्प करा. नद्यांना ही देशात माता मानतात या नद्याही स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा व देशातील माता – भगिनी व मुलींवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्याचा संकल्प नवरात्रीच्या काळात सर्व देशवाशीयांनी करावा व देशाला सत्यम, शिवम, सुंदरम करण्यात पुढाकार घ्यावा असे निवेदन देवी भागवत कथाकार साध्वी  वैभवी श्रीजी यांनी गुरूवारी (ता.29) क्रांती नवरात्र उत्सवात केले.

साध्वी वैभवी श्रीजी पुढे म्हणाल्या की, सात्विक आहार व्यक्तीला सत्त्वकडे नेतो आणि या सत्वातच कार्यसिद्धी असते, सत्वमध्येच संकल्प सिद्धी असते,असे संकल्प ही काळाची गरज आहे. देवी भागवत महापुरण यज्ञ कथा सोहळ्यात त्यानी निवेदन केले की, सतमार्गावर उचललेले एक-एक पाऊल  म्हणजे एक-एक यज्ञ होय.

या प्रसंगी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व साईभक्त विजू भाऊ कोते, साईभक्त पंकज लोढा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पवार, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती यांनी भेट देऊन  सप्तशृंगी देवी मातेच्या मूर्तीचे पुजन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. उत्सव समिती अध्यक्ष किरण व्यवहारे, कार्याध्यक्ष अमृत शिंदे, मयूर राजपूत, गणेश पवार, अमोल बोरणारे यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, दिनेश राजपुत, गणेश राजपूत, सोमु सोमवंशी, राहुल कुंदे, सम्राट राजपूत, प्रशांत सोमवंशी सहभाग नोंदवत आहेत.