मोबाईलच्या आयएमईआय नंबरची करावी लागणार नोंदणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोबाईल संबधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा नवी नियम लागू केला आहे. १ जानेवारी २०२३ पासून देशात विकल्या जाणार्‍या सर्व मोबाईल फोनसाठी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर ची नोंदणी अनिवार्य असेल.

सरकारने या संदर्भात २६ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतात विकल्या जाणार्‍या सर्व मोबाईल हँडसेटचे आयएमईआय क्रमांक त्यांच्या बनावट उपकरण प्रतिबंध पोर्टलवर नोंदणीकृत करावे लागतील.आयएमईआय क्रमांकाची नोंदणी केल्यामुळे केंद्र सरकारला हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन ब्लॉक करण्यास मदत होईल. सध्या अनेक घटनांमध्ये मोबाईल फोनचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.