शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी पायी निघालेल्या ज्ञानेश्वर आव्हाड या शिवसैनिकाचे श्रीमती वाणी यांनी केले स्वागत

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- बाळासाहेबांच्या विचारावर आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून शिवतीर्थावर शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारच सोनं लुटण्यासाठी दसरा मेळाव्यासाठी संभाजीनगर येथील रा.नरसिंहाची पाडळी ता. रत्नपुर येथील शिवसैनिक ज्ञानेश्वर आहेवाड हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी पायी निघाले आहेत.


बुधवारी वैजापूर येथे लोकनेते स्व.आर एम वाणीसाहेब यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई वाणी यांनी त्यांचे स्वागत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. देविदास वाणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी नगरसेवक लिमेश वाणी, युवासेनेचे अक्षय साठे आदी यावेळी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर आव्हाड यांचा मो. नं. +918329065328  हा आहे. वैजापूर येवला नाशिक इगतपुरी मार्गे ते जाणार आहे सदर मार्गातील शिवसैनिक बांधवांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन शिवसेनेचे वैजापूर तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी यांनी केले आहे.