खंडाळा येथे आजपासून माँ साहेब मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवा निमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या पुढाकारणे,शिवसेना शाखा खंडाळा व मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन वर्ष तिसरे महोत्सवाला बुधवारी (ता.२८)  प्रारंभ झाला असून कीर्तन महोत्सवाची सांगता आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे‌.
बुधवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी ह.भ.प.अडवोकेट अस्मिताताई सांगळे नाशिक यांचे कीर्तन झाले., गुरुवार दिनांक 29 रोजी रोजी ह भ प मुक्ताई महाराज चाळक टीव्ही स्टार भागवतकार पुणे, शुक्रवार दिनांक 30 रोजी अडवोकेट ह भ प पूजाताई पोखरकर अकोले, शनिवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी ह भ प सौ सुरेखाताई टेके वारीकर श्रीधाम वृंदावन, रविवार दिनांक 2 रोजी हा भ प सौ सुनीताताई पाटील चाळीसगावकर, सोमवार दिनांक तीन रोजी हा भ प कुमारी प्रियंकाताई राऊत अंबड, मंगळवार दिनांक चार रोजी ह भ प प्रतीक्षाताई जाधव गिरमरकर शिर्डी, गुरुवार दिनांक सहा रोजी ह भ प सौ वर्षाताई म्हस्के संभाजीनगर ,शुक्रवार दिनांक सात रोजी ह भ प अश्विनीताई तांबे लोणी प्रवारा तर शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत माझा ज्ञानोबा मालिका फेम ह भ प सौ. जयश्रीताई महाराज तिकांडे उपाध्यक्ष अखिल वारकरी महिला आघाडी संघ महाराष्ट्र राज्य पुणे विभाग यांचे काल्याचे किर्तन होणार आहे आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन महोत्सव श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान आरोग्यावरील खंडाळा येथे पार पडणार आहे.

दरम्यान शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे, शहर प्रमुख तथा न.प.गटनेते प्रकाश चव्हाण ,माजी तालुकाप्रमुख संजय निकम, जिल्हा समन्वयक युवा सेना संभाजीनगरचे उमेश शिंदे माझी जि प सदस्य मनाजी मिसाळ, उपतालुका प्रमुख मोहन साळुंखे ,सरपंच जितेंद्र जगदाळे, युवा तालुका प्रमुख विठ्ठल डमाळे हे भेटी देणारा असून कीर्तन महोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपसभापती प्रकाश शिंदे , संस्थापक मार्गदर्शक कचरू वेळंजकर,ताराचंद वेळंजकर, संस्थापक मुरली नाना थोरात, बाळासाहेब जानराव ,प्रकाश वाघचौरे, शांताराम वेळंजकर, सतीश बागुल, अरुण जाधव, शिवाजी जाधव ,वसंत मगर,शफिक शेख, शेखर ननवरे, शुभम जेजुरकर, समाधान बागुल, अमर सूर्यवंशी शिवराज पैठणकर ,कैलास बहाळसकर, प्रकाश आंबेकर ,डॉ.मंगेश बहाळसकर, दिपक पवार ऋषी थोरात, रोहन थोरात यांच्याशिवाय शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्याने आव्हान केले आहे.