महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात लाईव्ह सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी उद्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगानं  सुनावणी घ्यावी किंवा नाही यावर घटनापीठ सर्वात आधी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरील स्थगिती उठणार का याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे घटनापीठाच्या सर्व सुनावण्या आता लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणीही लाईव्ह होणार आहे. 

शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ निर्णय देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरुन राज्याच्या राजकारणात संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार असल्याची देखील शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले होते. यावर आता उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.