राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख शिवसेनेत
मुंबई :आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankaraoयांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.उस्मानाबाद जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत.
शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली.
कोण आहेत शंकरराव गडाख

Ø नाव : शंकरराव यशवंतराव गडाख
Ø जन्म : 29 मे, 1970
Ø शिक्षण : बी. कॉम
Ø पक्ष : शिवसेना
Ø मतदारसंघ : 221-नेवासा
Ø इतर माहिती : विधानसभा सदस्य, ऑक्टो. 2009 पासून ते 2014 पर्यंत; संचालक, अ. नगर जिल्हा सह. बँक लि . अ . नगर 2007 ते 2016;
चेअरमन, अ. नगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. 2007 ते 2008; चेअरमन – मुळा सह. साखर कारखाना लि . सोनई 1994 ते 2005; संस्थापक, मुळा सहकारी बँक लि. सोनई; संस्थापक, ‘ मुळा बाजार ‘ मुळा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था लि. सोनई संस्थापक, नेवासा तालुका सह. दूध संघ लिमिटेड सोनई; विश्वस्त, मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई;
नेवासा तालक्यातील शेतकऱ्यांच्या पाटपाणी व वीजेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने केली; नेवासा तालुका मार्केट कमिटीच्या घोडेगाव उप आवारात शेतकऱ्यांच्या सोईसाठी मोठ्या उलाढालीचे कांदा मार्केट सुरु; पांढरीपुल एम. आय. डी. सी. कार्यान्वीत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न; जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटांचे संघटन; जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षीय काळात शेती, शिक्षण व महिला बचत गटांचे बाबतीत सुवर्ण महोत्सवी निर्णय घेण्यात पुढाकार; मुळा कारखान्याचा 30 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात पुढाकार; मुळा कारखान्याचे अध्यक्षीय काळात कारखान्यास सलग 2 वर्षे V. S. I. कडून उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार; सन 2003 चे दुष्काळात 6000 जनावरांसाठी छावणी चालविली; संघटनात्मक कामासाठी वेळोवेळी युवक व शेतकरी मेळाव्यांचे आयोजन; नियंत्रणाखालील संस्थांच्या माध्यमातुन प्रभावी जनसंपर्क; सार्वजनीक ठिकाणी लोकांना भेटून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न व त्यासाठी स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय.