मातंग समाज संघटित होण्याची गरज – सचिन साठे

वैजापूर येथे मातंग समाजाचा मेळावा

वैजापूर,२६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- आजही मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, संघटित राहण्याचा अभाव आहे व एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची वृत्ती म्हणून मातंग समाजावर मोठयाप्रमाणात अन्याय व अत्याचार होत आहेत असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू व मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांनी सोमवारी(ता.26) वैजापूर येथे आयोजित मातंग समाज संघर्ष मेळाव्यात केले. 


येथील धुमाळ मंगल कार्यालयात हा मेळावा सकल मातंग समाज वैजापूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी आयोजित केला होता. यावेळी बोलतांना सचिन साठे पुढे म्हणाले की, समाजाने संघटित होणे गरजेचे आहे तसेच समाजातील नागरिकांनी एक दुसऱ्याचे पाय ओढणे ही थांबवायला हवे. याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, मानवहित लोकशाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राधाकिसन साठे, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर,पेशकार पारस पेटारे, आकाश बागुल व लहू कन्या दिव्या दीपक खैरनार यांची ही भाषणे झाली. प्रास्ताविकात  सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी मेळाव्याचा हेतू समाज संघटित करणे व मुख्यत्वे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने “भारत रत्न पुरस्कार” देऊन गौरवान्वित करणे असल्याचे विशद केले. आरंभी छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पाहुण्यांनी अभिवादन केले.

आयोजक अविनाश बागुल,;दीपक खैरनार, नवनाथ कोतकर, धर्मेंद्र त्रिभुवन, रविभाऊ पगारे,शिवाभाऊ थोरात, विशाल शिंदे, नामदेव त्रिभुवन, दीपक त्रिभुवन, सागर मोटे, किशोर म्हस्के, विलास म्हस्के, साहेबराव पडवळ, राहुल त्रिभुवन, बाबा पेटारे,विजय(बाबा)त्रिभुवन, बाबुराव त्रिभुवन, सचिन त्रिभुवन, बाळू बागुल यांनी मंचावरील सर्वांना एकच मोठा हार टाकून संघटीत्वाचे संकेत दिले. याप्रसंगी औरंगाबाद, जळगाव,बीड, जालना, अहमदनगर , नाशिक व राज्यातील इतर जिल्हयातील नागरिक   होते, या प्रसंगी भाजपाचे राज्य सदस्य एकनाथ जाधव, उपनगराध्यक्ष अकिल शेठ, अल्ताफ बाबा, नगरसेवक राजेश गायकवाड, श्रीकांत साळुंके, माजी नगरसेवक मधुकर त्रिभुवन तसेच मानव हित चे गणेश भगत, अण्णा कांबळे, बालाजी धुमाडे, आकाश बागुल, रावसाहेब मोटे, संतोष साठे, सुनील मोटे, कृष्णा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते,सूत्रसंचलन धोंडिरामसिं राजपूत यांनी केले आभार आकाश बागुल यांनी मानले.