तिडी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपचे नबी पटेल यांची निवड

वैजापूर,२५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर  तालुक्यातील तिडी येथील विविध विकास सोसायटीचे चेअरमनपदाची धुरा भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल यांच्याकडे एकमताने सोपविण्याची भुमिका संचालक मंडळानी घेतली.

भाजप आणि शिंदे सेना गटाचे एकहाती वर्चस्व असलेल्या या सोसायटीतील संचालक आणि सभासदांनी गावपातळीवर कोणतेही आढेवेढे न घेता अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधीकडे सहकारी सोसायटीचा कारभार सोपविण्याचा निर्णय  सामाजिक भूमिकेतून घेतला. सहकार अधिकारी तुषार ख्रिस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली तिडी विकास सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती.अध्यक्षपदासाठी नबी पटेल, तर उपाध्यक्षपदासाठी तुकाराम निघोटे या दोघांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.निवड प्रक्रियेला सोसायटीचे संचालक पंढरीनाथ जगताप, सुधाकर तांबे, वाल्मिक डुकरे, शेखनाथ जगताप, शेख मुसा अब्दुल पटेल, आबासाहेब डुकरे, भास्कर कांबळे, गणेश कोकाटे, संजय आहेर, रंजना तांबे, कमल डुकरे यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे आ.रमेश बोरनारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी अभिनंदन केले. …सभासदांचे विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करणार  -चेअरमन  नबी पटेल .. सहकार वर्तुळातील तिडी विकास सोसायटीचे चेअरमनपदी निवड झाल्यानंतर नबी पटेल यांनी संचालक आणि सभासदाशी संवाद साधताना ते म्हणाले की, गावपातळीवर अंत्यत प्रतिष्ठेची संस्था म्हणून सोसायटी ओळखली जाते.या संस्थेवर आमच्या कुंटुबातून यापूर्वी आजोबा फत्तु पटेल यांनी प्रतिनिधित्व केले.