वैजापूर पालिकेच्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-स्वच्छ सर्वेक्षण -2023 अंतर्गत पालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिला व पुरुष सफाई कामगारांची आरोग्य तपासणी बुधवारी (ता.21) करण्यात आली. पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता निकाळे व त्यांच्या सहकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या व औषध वाटप केले.

या आरोग्य शिबिराचे उदघाटन नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान व मुख्याधिकारी भागवत बिघोत तसेच जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनी धन्वंतरीची पूजन करून केले.

या आरोग्य शिबिरात 85 सफाई महिला व पुरुषकामगारांची आरोग्य तपासणी डॉ. सविता निकाळे यांनी केली. त्यांना मुख्य परिचारिका निर्मला जाधव, परिचर अशोक गायकवाड, सविता सिरसाट, श्रीमती जेजुरकर, श्रीमती खान यांनी सहकार्य केले. स्वच्छ सर्वेक्षण विभागातील महादेवाचा चांदगुडे, अभियंता सुरेश चिमटे, अभियंता मोदाणी, स्वच्छता निरीक्षक विष्णू आलूले, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन यांची उपस्थिती होत.