शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच :अखेर ठाकरेंना शिवाजी पार्कवर घेता येणार दसरा मेळावा!

मुंबई ,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीयशिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून लावलीय. कायदा सुव्यवस्था राखण्याची हमी देण्याचे निर्देशही ठाकरे गटाला कोर्टानं दिलेत. हायकोर्टानं ठाकरे गटाला दिलासा देताना मुंबई महापालिकेलाही फटकारलंय. 

शिवसेना पक्ष कोणाचा यात आम्ही जात नाही. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रलंबित.  22 ऑगस्टला शिवसेनेचा पालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज. त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून आमच्याकडे याचिका. 21 सप्टेंबरला पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा पालिकेला अहवाल. 22 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरपर्यंत अर्जावर निर्णय का घेतला नाही?

निर्णय न घेण्याचं समाधानकारक उत्तर पालिकेला देता आलेलं नाही. आमच्या मते निर्णय देताना पालिकेनं कायद्याचा गैरवापर केला.  हायकोर्टानं दिलेला हा निकाल शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे. मात्र हायकोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय. हायकोर्टाच्या या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारलाय.

कोर्टानं शिंदे गटाची याचिका फेटाळलीय. मुंबई महापालिकेलाही फटकारलंय. कोर्टाच्या निकालामुळे शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. शिंदे सरकार आल्यानंतर ठाकरेंना अनेक धक्के देण्यात आले. आता हायकोर्टाचा निर्णय़ हा ठाकरे गटाच्या बाजून लागल्यामुळे ठाकरेसेनेला मोठा दिलासा मिळालाय. मात्र शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत दिल्यामुळे पिक्चर अभी बाकी है असंच सध्याचं चित्र दिसतंय.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाकडून आपापली बाजू मांडण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कच्या संदर्भातील याचिकेवर याचिकाकर्ते शिवसेनेसाठी कायदेतज्ञ आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली.
ठाकरे यांचे वकील आस्पी चिनॉय बाजू मांडताना म्हणाले की, “राज्य सरकारने २०१६ मध्ये अध्याधेश काढलेला आहे. ज्यात राज्य सरकारने आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मेळवा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती.” असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
 घटनेनं स्पष्ट केले की, अश्या परिस्थितीत एखाद्या जागेवर कुणीही आपला कायम हक्क सांगू शकत नाही. तुमच्या एकत्र येण्यावर, भाषणावर गदा आणलेली नाही, मात्र त्याच जागेवर मेळावा घ्यायचाय आणि तो आमचा अधिकार आहे, असा दावाच करता येणार नाही. २०१२ मध्ये जेव्हा हे प्रकरण कोर्टात होतं तेव्हा इतर पर्याय उपलब्ध नसल्यानं त्यावर्षी त्यांना परवानगी दिली होती. तेव्हा शिवसेनेनं कबूल केलं होतं की आम्ही वेळेत अर्ज करू आणि पुढील वर्षी जर हे मैदान उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य जागेचा पर्याय निवडू, असं पालिकेच्या वतीने साठे म्हणाले.
 २०१४ दरम्यान निवडणुकांच्या आचारसंहितेचा मुद्दा होता, मात्र गेल्या तीन चार वर्षांत परवानगी दिल्याच्या मुद्यावर पुन्हा परवानगी देण्यात आली. या अर्जांच्या छाननीसाठी पालिकेचा नियम स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं २०१६च्या आदेशात जे ४५ दिवस राखीव आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. त्यात केवळ बालमोहन यांनाच बालदिन शिवाजी पार्कात परवानगा नावानिशी दिलेली आहे. बाकीच्या केवळ दिवसांचा उल्लेख आहे. दसऱ्याचा दिवस हा दसरा मेळाव्यासाठी राखीव आहे. मात्र तो कोणी घ्यावा हे आदेशात म्हटलेलं नाही, असंही साठे म्हणाले.