नांदेड जिल्ह्यात 59 व्यक्तींचे अहवाल बाधित

नांदेड दि. 10 :- सोमवार 10 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 147 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 59 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकुण 369 अहवालापैकी 274 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 356 एवढी झाली असून यातील 1 हजार 779 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 440 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 110 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 120 एवढी झाली आहे.आज बरे झालेल्या 147 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 31, देगलूर कोविड केअर सेंटर 13, कंधार कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 15, किनवट कोविड केअर सेंटर 5,मुखेड कोविड केअर सेंटर 4, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 70, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5 येथील बाधितांचा समावेश आहे. आजवर एकूण 1 हजार 779 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकूण 11 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 440 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार22,
घेतलेले स्वॅब- 22 हजार 58,
निगेटिव्ह स्वॅब- 17 हजार 14,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 59,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 356,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 24,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,
मृत्यू संख्या- 120,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 779,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 440,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 213,
आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *