प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यात दोन हजारांवर उमेदवारांची निवड

औरंगाबाद,​२०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-हैदराबाद  मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन दिवसीय प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.मेळाव्यात तीन हजार 514 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातून एक हजार 259 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

अप्रेंटिसशीपसाठी दोन हजार 875 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातून एक हजार 196 उमेदवारांची निवड झाली. मेळाव्यासाठी 29 कंपन्या, अप्रेंटिसशीपसाठी 68 कंपन्यांनी सहभाग नोंदवला, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळवले.