गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनता मतदानाची वाट पाहत आहे – युवासेना सचिव वरुण सरदेसाई

औरंगाबाद मध्य मतदारसंघात युवासेना शाखेचे उदघाटन

औरंगाबाद,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्हा हा मुंबई ठाण्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्याने सहा शिलेदार विधानभवनात पाठवले, मात्र चार ते पाच वेळा शिवसेनेने संधी देऊनही काही लोकांनी गद्दारी केली, हे लोकांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनता मतदानाची वाट पाहत असल्याचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात युवासेना शाखेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटना मजबूत असल्याने गद्दार लोकांना सळो की पळो करून सोडवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद मध्य विधानसभा अंतर्गत श्रीकृष्णनगर, टिव्ही सेंटर, हडको,  टीव्ही सेंटर चौक येथे झाले.या प्रसंगी युवक प्रचंड संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात युवासेना औरंगाबाद मध्यच्या वतीने शहर प्रमुख सागर खरगे यांनी केले. याप्रसंगी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, माजी नगरसेवक मोहन मेघावाले, महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा जगताप, युवासेना जिल्हा समन्वयक संदीप लिंगायत, उपजिल्हा अधिकारी नारायण सुरे, युवती सेना जिल्हा युवती अधिकारी पूजा घुगे, सानिका देवराज, श्वेता टोंपे, धर्मराज दानवे, स्वप्निल डिडोरे, सागर वाघचौरे, प्रसाद पानपट, अभिजित थोरात, मधुर चव्हाण, आकाश जैन, नागेश थोरात, खुशाल हरणे, राहुल पेरे, कृष्णा मोटे, सागर भारस्कर, नितु मानकापे, अजय रेड्डी, शुभम त्रिभुवन, किरण सुरे, राजतिलक मेघावाले, महिला आघाडीच्या संगीता बोरसे, रंजना कोलते, पुष्पा सालपे आदी शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विभाग युवाअधिकारी केदार पोतदार, उपविभाग युवाअधिकारी आश्लेष कुमावत, शाखा युवाअधिकारी अनिकेत साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.

तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी युवासेना आवाज उठवणार – युवासेना सचिव वरुण सरदेसाई 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चिकलठाणा शाखेचे उदघाटन

आजच्या पिढीला चांगले शिक्षण व रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी येणाऱ्या संधीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी युवासेना लागेल ते सहकार्य करेल. तसेच अडचणी सोडवण्यासाठी युवकांसाठी युवासेना आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चिकलठाणा युवासेना शाखेचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व  शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी युवासेना उपसचिव  ऋषिकेश खैरे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, युवासेना विस्तारक मंदार चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख रमेश दहीहंडे, माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने, नगरसेवक कमलाकर जगताप , युवासेनेचे  सतीष पवार, संदीप लिंगायत , भागीनाथ रिठे, भुषण बकाल, रामेश्वर कोरडे , सोमनाथ नवपुते, सुनील सदगिर, संजय कोरडे , सारंग सोत्रे, धोंडीराम रिठे, राजु रोठे, विलास बोचरे, सत्यम भंडारी, आकाश रिठे, योगेश जगताप, दत्ता कणसे, योगेश वडेकर, प्रशांत कुऱ्हे, आकाश पोळ, आदित्य दहीवाळ, संतोष जाधव, बाळासाहेब दहीहंडे, साईनाथ दहीहंडे, दिनील गजरे, सोपान बकाल, रोहित धोत्रे, सुदर्शन नवपुते, योगेश ओलेकर, उत्तम रीठे, सुरेश बनसोडे, विष्णु रीठे, विनोद रीठे, कृष्णा रीठे, सोपान दहीहंडे, गोट्या नवपुते, ऋषिकेश तोरणमल, अजय भारती, सुनिल रीठेस्वप्नील शेळके, गजानन राऊत, प्रदीप केदार, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गाभाटी, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, उपशहर संघटक रेखा शाह, मनीषा खरे, वैशाली कोरडे, धोंडाबाई रिठे, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

निष्ठावंत शिवसैनिक हा कुठले पद अथवा सत्तेचा भुकेला नाही -युवासेना सचिव वरुण सरदेसाई

जेष्ठ शिवसैनिक पुंडलिक राऊत यांच्या स्मारकास दिली भेट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन असंख्य शिवसैनिकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. यामध्ये जेष्ठ शिवसैनिक स्वर्गीय पुंडलिक राऊत हे होते. शहराच्या नवीन वसाहतीमध्ये सेवा,सुरक्षा आणि पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले होते. शिवसेनेचा जन्म हा सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे कुठल्याही पदासाठी अथवा सत्तेचा तो भुकेला नसतो.असे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
पुंडलिकनगर भागातील जेष्ठ शिवसैनिक पुंडलिक राऊत यांच्या स्मारकास दिली भेट दिली,त्याप्रसंगी ते बोलत होते.जनतेसाठी लढणाऱ्याच्या पाठिशी जनतेने ताकदीने आणि भक्कमपणे उभे राहावे, त्यामुळे त्यांना या प्रेरणा मिळते, असे आवाहन त्यांनी केले. एका सामान्य शिवसैनिकाच्या नावाने पुंडलिकनगर ही वसाहत असून हिंदु रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकाचे जिल्ह्यात एकमेव स्मारक असल्याचे विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी सांगितले. यावेळी युवासेना उपसचिव ऋषीकेश खैरे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक, मनोज गांगवे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखाने, सागर खरगे, अभिजीत थाेरात, उपशाखाप्रमुख भरत ढवळे, विभागप्रमुख बापू कवळे, अल्पसंख्यांक आघाडी पूर्व संघटक अखिल शेख, दीपक परेराव, सिध्दार्थ वडमारे, विशाल गायके, स्वप्नील डिडोरे, जालींदर शिरसाट, राज नीळ, राजू चव्हाण, गणेश जैस्वाल, सागर वाघचौरे, बालाजी राऊत, विक्रांत पवार, मनोज बोरा, अमोल देशमुख, किशोर जाधव यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटना व पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते युवतीसेना शाखेचे उदघाटन

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने आज मराठवाड्यातील प्रथम युवतीसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.सिडको एन ८ गणेशनगर वार्ड येथे युवती सेनेच्या सानिका देवराज यांच्या संयोजनातून शाखा उदघाटन पार पडले.
यावेळी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, युवासेना जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, गीता राजपूत, अश्विनी राजपूत, अपेक्षा गवई, श्रेयश गवई, श्वेता टोम्पे, साक्षी धुमाळ, सुरभी शास्त्री ,विनित शेळके, यश देवराज, रेणुका कुलकर्णी, छाया देवराज, पल्लवी कोळी, प्रतिभा शिंदे ,गौरी पाटील, नयना आव्हाड, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, उपशहर प्रमुख सुरेश कर्डीले, शाखाप्रमुख चंद्रकांत देवराज, प्रतीक अंकुश, सागर वाजपेयी, जनार्दन छत्रे, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.