दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार – विरोधीपक्षनेते अंबादास दानवे

औरंगाबाद,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दसऱ्यानिमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.१९६६ साला पासून शिवसेनेच्यावतीने शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. ही प्रथावर्षानुवर्षे चालत आली आहे. याला खंड पडण्याचे कारण नाही.

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कालच प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार? याबाबत शंका बाळगू नये असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना येथील युवासेना निर्धार मेळाव्या दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हटले.