कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील जन भावना लक्षात घेऊन हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय


हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे निजाम राजवटीपासून मुक्तीसाठी झालेल्या या महान मुक्तिसंग्रामाचा इतिहास आणि अनाम शहिदांच्या कहाण्या युवा पिढीपर्यंत पोहचवून त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे

हैदराबाद,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज तेलंगणातील 75 व्या हैदराबाद मुक्ती दिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001UVP0.jpg

यावेळी आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता, पण हैदराबादला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. 13 महिने या प्रदेशाने निजामाचे अन्याय आणि अत्याचार सहन केले आणि त्यानंतर सरदार पटेलांनी पोलीस कारवाई केल्यावर तेलंगणा स्वतंत्र झाला. कोमाराम भीम, रामजी गोंड, स्वामी रामानंद तीर्थ, एम चिन्नारेड्डी, नरसिंह राव, शेख बंदगी, केव्ही नरसिंह राव, विद्याधर गुरु आणि पंडित केशवराव कोरटकर यांसारख्या असंख्य लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.   ते म्हणाले की निजामाविरुद्ध बंडाची हाक देणाऱ्या अनाभेरी प्रभाकरी राव, बद्दम येल्ला रेड्डी, रवी नारायण रेड्डी, बुरुगुला रामकृष्ण राव, काळोजी नारायण राव, दिगंबरराव बिंदू, वामनराव नाईक, आ. कृ. वाघमारे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बी. रामकृष्ण राव याना श्रद्धांजली अर्पण करतो. निजामाविरुद्ध लढणाऱ्या आणि रझाकार सेनेच्या विरोधात सशस्त्र संघर्ष करणाऱ्या कल्याण कर्नाटकातील अनेक नेत्यांना शहा यांनी वंदन केले. यामध्ये बीदरचे माजी खासदार रामचंद्र वीरप्पा, जेवर्गीचे सरदार शारंगौडा पाटील, रायचूरचे के  एम. नागप्पा, कोप्पलमधून नंतर लोकसभेचे सदस्य झालेले शिवकुमारस्वामी अलवंडी, कनकगिरीचे जयतीर्थ राजपुरोहित, यादगीरचे कोल्लूर मल्लप्पा, करातगीचे बेनकल भीमसेनराव आणि अन्य लोकांचा समावेश आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002C4FT.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, हैदराबाद मुक्ती दिन सरकारी कार्यक्रम म्हणून  साजरा करावा, अशी या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पण दुर्दैव आहे की 75 वर्षात इथे राज्य करणाऱ्यांनी व्होट बँकेच्या राजकारणामुळे हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचे धाडस केले नाही.

ते म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन हैदराबाद मुक्ति दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मोदीजींचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.

अमित शाह म्हणाले की हैदराबाद मुक्ती दिवस साजरा करण्या मागचा उद्देश, या मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि ज्ञात-अज्ञात शहीदांच्या गाथा युवा पिढीच्या मनात पुनरुज्जीवित करून त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणे हा आहे. यामुळे आपल्या नवीन पिढी मध्ये देशभक्तीची भावना पुनरुज्जीवित होईल. शाह यांनी आज सरदार पपन्ना गौड़, तुर्रेबाज़ खान, अलाउद्दीन, भाग्य रेड्डी वर्मा, पंडित नरेंद्र आर्य, वंदेमातरम रामचंद्र राव, शोयबुल्ला खान, मोगिलिया गौड़, डोड्डी कोमारैया, चकली इलम्मा यांच्या प्रति देखील कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी विशेषतः नारायण राव पवार, जगदीश आर्य आणि गंदैया आर्य या वीर स्वातंत्र्य सेनानींना आदरांजली वाहिली, ज्यांनी निजामाच्या सुरक्षा रक्षकांचा सामना करताना शौर्याची पराकाष्ठा केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी उस्मानिया विद्यापीठात राष्ट्र ध्वज फडकवणाऱ्या देशभक्तांना देखील नमन केलं, ज्यांना निजामाच्या सेनेनं अटक केली होतं. ते म्हणाले की अनेक संघटनांनी स्वातंत्र्याच्या या लढाईत आपलं योगदान दिलं होतं. आर्य समाज, हिंदू महासभेचा भागानगर सत्याग्रह असो, की उस्मानिया विद्यापीठात छेडलेलं वंदे मातरम आंदोलन असो. गांधीजींनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेस आणि बिदर क्षेत्रातील शेतकरी  त्या वेळच्या संघर्षाची लोकगीतं आजही गातात.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00409LT.jpg

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की आजच्याच दिवशी 1948 मध्ये तेलंगणा, मराठवाडा आणि कल्याण कर्नाटक स्वतंत्र झाले आणि 13 ते 17 सप्टेंबर 1948 दरम्यान झालेल्या 109 तासांच्या संघर्षात अनेक वीर या ठिकाणी शहीद झाले. ते म्हणाले की निजाम आणि त्याच्या रझाकारांनी विविध प्रकारचे कठोर कायदे लागू करून असह्य अन्याय आणि महिलांवर अत्याचार करून तिन्ही राज्यांच्या जनतेला चिरडण्याचा प्रयत्न केला होता. ही  दुष्कृत्य आणि अत्याचारा विरोधात आपल्या जनतेने आंदोलन केलं होतं आणि शेवटी आपण विजयी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद मुक्ती दिनाला संपूर्ण शासकीय आदेशा अंतर्गत साजरा करण्याचा निर्णय घेऊन हैदराबाद मुक्ती संग्रामाला स्वीकृती आणि आदरांजली वाहिली आहे.  

Image

शाह म्हणाले की ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला सुरक्षित आणि विकसित केलं आहे, भारतीय आणि भारतीयत्वाला सर्वोच्च स्थानी बसवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, आणि देशाच्या सर्व शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, हा उपक्रम निश्चितपणे सुरूच राहील आणि हैदराबाद मुक्ती दिन साजरा करणेही निश्चितच सुरु राहील.