प्राण प्राण जिव जीव है (स्वर्वेद पंचम मंडल अष्टम अध्याय)

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक “मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

परिभू स्वयम्भू आतमा, धारक अन्त प्रकाश ।

प्राण प्राण जिव जीव है, परम देव परभास ।।१०५।। (स्वर्वेद पंचम मंडल अष्टमअध्याय) ०५/०८/१०५

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

तो परमप्रभू सर्व बाजूंनी सर्वाधार होऊन स्वतः आपल्या स्वयं आधारावर स्थित आहे म्हणून अंती आपला आधार आपणच असल्याने त्याला स्वयंभू म्हणतात. तो सर्व जगाचा धारक तथा प्रकाशक आहे. प्राणांमध्ये प्राणन-शक्ती देणारा तसेच सर्व जीवांचे जीवन, आत्म्याचा परम प्रकाश आहे.


 *संदर्भ : स्वर्वेद* हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org