आज 2487 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद, तर 1248 रुग्ण कोरोनामु्क्त

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 2487 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 36031 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2286 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1248 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 29329 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 43 महिला आहेत. त्यातील 47 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 35 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 89 रुग्णांपैकी 56 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

आज झालेल्या 89 मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 27 एप्रिल ते 27 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 50 मृत्यूपैकी मुंबई 27, नवी मुंबई 9, मालेगाव 6, कल्याण डोंबिवली 4, ठाणे 3 तर सोलापूरमधील 1 जण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *