आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी) ने आज संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-अ‍ॅडव्हान्स २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालासोबत जेईई अ‍ॅडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

जेईई-अ‍ॅडव्हान्स २०२२ निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे. तर आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही देशातून मुलींमध्ये प्रथक क्रमांकावर आहे. आयआयटी मुंबई झोनचे २९ विद्यार्थ्यांनी देशातील टॉप १०० मध्ये स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबई झोनच्या आर.के. शिशिरने ३६० पैकी ३१४ गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

ही आहे टॉप-10 ची यादी

1. आर के शिशिर
2. पोलू लक्ष्मी साई लोहित रेड्डी
3. थॉमस बिजू चिरमवेली
4. वंगापल्ली साई सिद्धार्थ
5. मयंक मोटवानी
6. पॉलिसेट्टी कार्तिकेय
7. प्रतीक साहू
8. धीरज कुरुकुंड
9. महित गढ़ीवाला
10. वेचा ज्ञान महेश