परमानंद परमप्रभूचे सुख सर्वांपेक्षा महान आणि श्रेष्ठ :स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका आज दिनांक मध्ये रोज खास वाचकांसाठी.

परमानन्द महान है, शब्दानन्द स्वरुप ।
अपरछिन्न सागर भरा, अमृत तत्त्व अनूप ।।०३।। (स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय)

मुळ भाष्याचा मराठी अनुवाद :
जगातील सर्व सुखे अनित्य आहेत. परमानंद परमप्रभूचे सुख सर्वांपेक्षा महान आणि श्रेष्ठ आहे. तीन पाद-अनिर्वाच्य नि:शब्द आनंद स्वरूप परमेश्वराच्या प्राप्तीने जीव अमर होऊन जातो. तो अमृताचा महासागर भरलेला आहे. त्या अनंत महासागराची सीमा नाही. तो एकरस सर्व व्यापक होऊन ओतप्रोत परिपूर्ण आहे.