उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई, दि 9 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन  गणरायाचे दर्शन घेतले.  राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी  अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.