सीएमआयए टीमने दिल्ली भेटीत केले औरंगाबादचे ब्रॅण्डिंग

  • महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिश शाह यांच्याशी घेतली भेट
  • इन्व्हेस्ट इंडिया, रक्षा मंत्रालय, नीती आयोग, एमएसएमई मंत्रालयाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी, तसेच व्हियतनाम देशाचे राजदूत यांची घेतली भेट

औरंगाबाद,९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरात मोठी गुंतवणूक यावी यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड कॉमर्स (सीएमआयए) संस्थेने पुढाकार घेतला असून, नवी दिल्ली येथे महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिश शाह, तसेच इन्व्हेस्ट इंडिया, रक्षा मंत्रालय, नीती आयोग, एमएसएमई मंत्रालयाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी, तसेच व्हियतनाम देशाचे राजदूत यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सीएमआयए शिष्टमंडळाने शहराचे ब्रँडिंग करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली. सीएमआयए संस्थेच्या वतीने दिल्ली येथे जाऊन विविध विभागामध्ये शहराबद्दल सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने भेटी घेण्यात आल्या, या भेटी दरम्यान सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव अर्पित सावे, सहसचिव सौरभ भोगले आणि माजी अध्यक्ष तथा मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Image

औरंगाबादेत गुंतवणूक करण्याबाबत महिंद्र ग्रुप करणार सकारात्मक विचार
सीएमआयए संस्थेच्या शिष्टमंडळाने डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने आयोजित नवी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयामध्ये महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ. अनिश शाह आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. मनोज चौघ यांची भेट घेतली. या वेळी सीएमआयए टीमने औरंगाबादच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्र , डीएमआयसी कॉरिडॉरचा भाग असलेल्या ऑरीकमधील सुविधांची माहिती तसेच इथे विकसित असलेल्या इकोसिस्टीम बद्दल सविस्तर माहिती दिली अहि माहिती अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली. औरंगाबाद शहराचा औद्योगिक विकास, पोर्ट, रस्ते, आणि विमानमार्गे असलेली चांगली कनेक्टीव्हीटी, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा, पर्यटन तसेच ऐतिहासिक महत्व, तसेच असलेले कुशल मनुष्यबळ यामुळे महिंद्र ग्रुपने आपल्या गुंतवणुकीसाठी औरंगाबादचा विचार करावा अशी गळ सीएमआयएच्या वतीने अनिश शाह यांना घालण्यात आली.

Image


शाह यांनी या बैठकीमध्ये सीएमआयएच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल तसेच औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रात इथे गुंतवणूक करण्यात येईल असे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच कंपनीची टीम ऑरिक, औरंगाबाद येथे भेट घेऊन इथे उपलब्ध असलेल्या सेवा सुविधांची माहिती घेतील असे त्यांनी सांगितले. आपल्या प्रदेशाचे मार्केटिंग करण्यासाठी सीएमआयएच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले.

Image

कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाने घालावे लक्ष
सीएमआयए टीमने इन्व्हेस्ट इंडियाचे एमडी आणि सीईओ दीपक बागला यांची भेट घेतली. औरंगाबाद विभागाच्या प्रचारासाठी सीएमआयएच्या वतीने मांडणी करण्यात आली. याप्रसंगी औरंगाबादमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन इन्व्हेस्ट इंडियाच्या वतीने देण्यात आले. तसेच ऑरिकच्या मार्केटिंगसाठी सीएमआयए टीमने इन्व्हेस्ट इंडियाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन दीपक बगला यांनी केले. तसेच नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून मदत केली जाईल. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात औरंगाबादेत विविध देशाचे दूतावास आणि व्यापार संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात्त येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Image

औरंगाबादमध्ये डिफेन्स क्लस्टर विकसित करण्याची सीएमआयएची मागणी
दिल्ली भेटी दरम्यान सीएमआयए टीमने रक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांची भेट घेऊन औरंगाबादमध्ये घोषणा करण्यात आलेल्या डिफेन्स क्लस्टरची स्थापना करण्याची मागणी केली अशी माहिती संस्थेचे सचिव अर्पित सावे यांनी केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने याबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आली असल्याची माहिती सीएमआयएच्या वतीने देण्यात आली. औरंगाबादमध्ये रक्षा क्षेत्राशी निगडीत मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याची क्षमता असून ऑरिक बिडकीन येथे हे क्लस्टर स्थापन केल्यास प्रदेशात रोजगारांच्या मोठ्या संधी प्राप्त होतील.

Image

मराठवाड्यातील स्टार्टअप्सना मिळावी चालना
स्टार्टअप इकोसिस्टीम विकासाकरिता आणि मराठवाड्यासारख्या प्रदेशातून नवउद्योजक घडावे याकरिता जागतिक दर्जाचे इनक्युबेशन केंद्र, टेक्नोलॉजी पार्क, रिसर्च आणि डेव्हलोपमेंट केंद्राची स्थापना करण्यात यावी अशी मागणी. देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याबोबत झालेल्या बैठकी दरम्यान सीएमआयए आणि माजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली अशी माहिती सीएमआयचे माजी अध्यक्ष व मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी दिली. दिल्ली दौर्यामध्ये शिष्टमंडळाने नीती आयोग, एमएसएमई मंत्रालय, आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या मुख्य अधिकार्यांना भेटून मराठवाड्यामध्ये स्टार्टअप्स, नव उद्योजक यांच्याकरिता विविध प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली.

जी-२० परिषदेमधून औरंगाबादला मोठी संधी: डॉ निरुपमा डांगे

Image


आगामी वर्ष्यात भारताला जी-२० परिषदेचे यजमानपद मिळाले आहे, या शिखर परिषदेपूर्वी जगभरतील देशांना भारताची ओळख व्हवी या उदेशांने देशातील निवडक शहरांमध्ये बैठक आणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यातील दोन कार्यक्रम औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात येणार असून औरंगाबादला यामधून औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी संधी निर्माण होणार असल्याची माहिती दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाचे अतिरिक्त निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली. या बैठकीचे आयोजन औरंगाबादमध्ये व्हावे याकरिता त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. सीएमआयएच्या वतीने मुकुंद कुलकर्णी आणि सुयोग माछर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी धन्यवाद केले. सीएमआयएच्या टीमने व्हियतनाम देशाच्या दूतावासाची भेट घेतली. दोन देशातील व्यापार आणि उद्योग संबंधाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.