वैजापूर तालुक्यातील वक्ती – पानवी सोसायटीवर महाविकास आघाडीचा झेंडा

वैजापूर,​९​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वक्ती – पानवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले.

विजयी उमेदवारांचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख डॉ. प्रकाश पाटील शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश आल्हाट, अमोल पाटील मलीक, राजू पाटील गलांडे आदींनी सत्कार केला.निवडून आलेल्या नानासाहेब शेषराव गायकवाड, अनिता भावराव गायकवाड, साहेबराव खंडु गायकवाड, आशाताई रतन गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, राहुल गायकवाड, शशिकांत गायकवाड, कोडिंराम गुंडदे, निर्मला साळुंके, निर्मला गुडदे, पुंडलिक जाधव, सुदाम तोगे, रामदास सोमवंशी या सर्व संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रामदास काळे, संतोष गायकवाड, वसंत  गायकवाड, संदिप गायकवाड, संतोष रामराव गायकवाड, बबन गायकवाड, बाळु नेमाने, बाळासाहेब गायकवाड, सुनिल काळे, राजु गायकवाड, सुरेश आप्पा गायकवाड, संदिप गुडदे, हारि आबा, दिलिप गायकवाड, अशोक देवरे, नंदु केळगधरे, गणेश गायकवाड, नानाभाऊ साळुंके, कोडिराम तोगे, रमेश गायकवाड, साहेबराव अण्णा, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.