परभणीचे सुपुत्र कुणाल चव्हाण युपीएससी उतीर्ण

परभणी,दि.08 :- जिल्हयातील जिंतूर तालूक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील खरदडी या गावातील सध्या परभणी येथे एकता कॉलनीत राहणारे श्री. मोतीराम चव्हाण यांचे चिरंजीव कुणाल चव्हाण युपीएससी परिक्षेत 211 क्रमाकांवर उतीर्ण झाले आहेत. 

Displaying Photo (2).jpg

महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) या संस्थेत एक वर्ष राहून आयएएस परिक्षेची त्यांनी तयारी केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रकाशन असलेल्या लोकराज्य मासिकाचा अभ्यास करताना भरपूर फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. आई, वडिलांची प्रेरणा व तीन मोठ्या बहिनींचे मार्गदर्शन अभ्यास करताना प्रेरणादायी ठरले. पुणे येथील भूषण देशमुख या शिक्षकांचे मार्गदर्शन व मित्र परिवारातील मंगेश लटपटे, बिपीन आंबेडकर, राजेश काळे, अनुराग काळे यांच्या सहकार्यामुळे आज आयएएस परिक्षा उतीर्ण झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर टाळावा असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Displaying Photo (1).jpeg

कुणाल चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण गांधी विद्यालय, एकता नगर परभणी येथे झाले. 11 वी व 12 वी चे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले. त्यानंतर इलेक्ट्र्रॅानिक ॲन्ड टेलीकमुनिकेशन मधून पदवीचे शिक्षण केले. Bosch कंपनीत सॉक्टवेअर इंजिनियर म्हणून नौकरी केली. नौकरी करत असतानाच देशासाठी काहीतरी करावे या प्रेरणेने त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडत देश सेवेसाठी 2015 मध्ये युपीएसीची तयारी करण्यास सुरवात केली. अतिशय जिद्द व सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली. त्यांचे वडील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वर्ग 1 या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *