भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

वैजापूर,​८​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा खरिप पिकांना बसल्याने पिके भुईसपाट होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डाॅ. दिनेश परदेशी यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

गेल्या 3 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या  गारपीटीमुळे कापूस, मका, बाजरी, ऊस, सोयाबीन आदी पिकांसह पपई, मोसंबी, डाळिंब अशा फळबागांना मोठ्याप्रमाणात फटाका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.  विशेषतः कापूस व मकाच्या पिकांचे अतोनात झाले. पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी तालुक्यातील डवाळा, वैजापूर ग्रामीण दोन, भग्गाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.