वैजापूर शहरात “श्री” विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते मोकळे करण्याचे काम पालिकेतर्फे सुरू

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-
श्री गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी आहे. त्यादृष्टीने वैजापूर शहरातील श्री विसर्जन मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम व खड्डे बुजवण्याचे काम पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे.

मंगळवार व बुधवारी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी,उपनगराध्यक्ष साबेर खान व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी मुख्य विसर्जन मार्ग, श्री मूर्ती विसर्जन विहीर, नारंगी धरण येथे भेटी देऊन पाहणी केली. पालिकेच्या वीज पुरवठा विभागाच्यावतीने नारंगी धरणावर व “श्री”  विसर्जन विहिरीजवळ विद्युत खांब लावून विद्युत दिव्यांची सोय केली असून विहिरी व धरणावर  पालिकेने श्री विसर्जनसाठी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. पोलीस बंदोबस्त ही राहणार आहे, काही जलतरणपटू ही नियुक्त केलेले आहेत. अशी माहिती  मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली. 
याप्रसंगी गणेश महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, सरचिटणीस ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, नगर परिषदेचे शहर अभियंता प्रकाश पाटील, श्री चिमटे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाले, सहायक रमेश त्रिभुवन, विष्णू आलूले विद्युत वायरमन गणेश टिभे, पत्रकार घनश्याम वाणी, बापू गावडे यांची उपस्थिती होती.