औरंगाबादेत ३३९ नवे कोरोनाबाधित,१३ मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) दिवसभरात ३३९ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६,११३ झाली आहे. त्याचवेळी शुक्रवारी दिवसभरात २८४ बाधित हे कोरोनामुक्त झाले. यामध्ये शहरातील १४९ व ग्रामीण भागातील १३५ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ११,९६० बाधित हे कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३,६३१ बाधितांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत ५२२ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यातील २७ ते ७१ वयोगटातील १३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ५२२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) दिवसभरात ३३९ नवे कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६,११३ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) बजाज नगर, जयभवानी चौकातील २७ वर्षीय पुरुष, हडको टीव्ही सेंटर येथील ६१ वर्षीय महिला, एन-११ हडकोतील ६५ वर्षीय पुरुष व मुकुंदवाडीतील राजीव गांधी नगरातील ७० वर्षीय महिला, या चार कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, टीव्ही सेंटर येथील ६९ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, शिवाजी नगर, गारखेडा येथील ७१ वर्षीय पुरुष, अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरुष, सिडकोतील ६२ वर्षीय महिला, बजाज नगरातील ५७ वर्षीय महिला, वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय महिला, पानवडोद, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरूष, तसेच खडकेश्वर, मिलकॉर्नर येथील ५९ वर्षीय पुरूष, या ९ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३९२, तर जिल्ह्यात ५२२ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  सायंकाळनंतर 236 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 57, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 59 आणि ग्रामीण भागात 115 रूग्ण आढळलेले आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *