भारतात सलग 4 थ्या दिवशी 24 तासांत 6 लाख नमुन्यांची चाचणी

2.27 कोटींपेक्षा अधिक नमुन्यांची चाचणी

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट 2020

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने, देशात सलग चौथ्या दिवशी दररोज 6 लाखांपेक्षा अधिक कोविड-19 नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. प्रयोगशाळांचे विस्तारलेले जाळे आणि सुविधा यामुळे गेल्या 24 तासांत देशात 6,39,042 नमुना चाचणी करण्यात आल्या आहेत. देशात सध्या 2,27,88,393 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या वाढून ती आता 16,513 एवढी झाली आहे.

दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या साप्ताहिक सरासरीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन, 14 जुलै 2020 रोजी 2.69 लाख एवढी संख्या होती, ती 6 ऑगस्ट 2020 रोजी 5.66 लाख एवढी झाली.14 जुलै 2020 रोजी संचयी चाचण्यांची संख्या 1.2 कोटी होती ती वाढून 6 ऑगस्ट 2020 रोजी 2.2 कोटी एवढी झाली. याच काळात सकारात्मकता दर 7.5% वरुन 8.87% झाला. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे सकारात्मकता दरात वाढ झाली, पण दिल्लीतील अनुभवाने स्पष्ट केले की, त्वरीत अलगीकरण, ट्रॅकींग आणि वेळीच रुग्णालय व्यवस्थापन या उपायाने हे कमी होईल.

देशभरातील प्रयोगशाळांचा विस्तार करण्यात येत आहे. सध्या देशात 1,383 प्रयोगशाळा आहेत, यात 931 प्रयोगशाला सरकारी आणि 452 खासगी आहेत. यात:

• रिअल-टाईम आरटी पीसीआर आधारीत चाचणी प्रयोगशाळा: 701 (सरकारी: 423 + खासगी: 278)

• ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 573 (सरकारी: 476 + खासगी: 97)

• सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 109 (सरकारी: 32 + खासगी: 77)

रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 68 टक्क्याच्या नवीन उच्च स्तरावर

कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या दरात सतत होणारी वृद्धी आणि जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील कमी मृत्यू दर या दोन महत्वपूर्ण कामगिरींसोबत भारत कोविड-19 व्यवस्थापनाच्या मार्गावर आगेकूच करत आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 68% तर मृत्यू दर 2.05% या नवीन पातळीवर पोहचल्याने कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सुनिश्चित झाले आहे. या दोन महत्वपूर्ण कामगिरींमुळे भारतात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांमधील फरक (7.7 लाखांहून अधिक) वाढला आहे.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 49,769 रुग्ण बरे झाल्याने कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा  13,78,105 वर पोहोचला आहे.

रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि केंद्राने जारी केलेल्या क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर कार्यक्षम उपचार करण्यावर भर दिला गेला आहे. गेल्या दोन आठवड्यात सरासरी दररोज रुग्ण बरे (7 दिवसांची सरासरी) होण्याच्या संख्येत वाढ होऊन ती 26000 वरून 44000 झाली आहे.

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने केलेल्या केंद्रित आणि समन्वित नियंत्रित निरंतर प्रयत्न, व्यापक चाचणीयांच्यासह पर्यवेक्षित विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे सक्रिय रुग्णांच्या टक्केवारीतील घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *