नांदेड जिल्ह्यात 182 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 7 :- जिल्ह्यात आज 7 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 108 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 182 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 459 अहवालापैकी 1 हजार 234 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 42 एवढी झाली असून यातील 1 हजार 323 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 590 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 85 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार 6 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील तामसा येथील 75 वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील कांझी मोहल्ला येथील 42 वर्षाची महिला, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर मोमीन गल्ली मुखेड येथील 86 वर्षाचा एक पुरुष मुखेड कोविड केअर सेंटर येथे, एसव्हीएम कॉलनी 52 वर्षाची एक महिला गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 114 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या एकूण 108 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.अँटिजेन तपासणीद्वारे एकूण 102 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 590 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 753,घेतलेले स्वॅब- 20 हजार 76,निगेटिव्ह स्वॅब- 15 हजार 554,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 182,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 42,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 18,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,मृत्यू संख्या- 114,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 323,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 590,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 100. आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 85

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *